अब मुझे कोई इंतजार कहा...

सकाळी सकाळी बडी धीरे जली रैना आणि अब मुझे कोई इंतजार कहा ऐकत बसले होते... वाऱ्याने उडणारे केस सावरत.. चहाचा सिप घेत...
एकदम जाणवलं आता आजपासून सासूबाई एक आठवडा राहायला येणार आहेत.
आपली स्पेस संपली...
आयता काढून दिलेला आमरस मिळेल, झक्कास चवीचं चिकन आणि आंबट वरण मिळेल, अक्षराला कंपनी आणि घरात एक वडीलधारं निरांजन तेवत असल्यातून मिळणारी शांतता... नक्कीच मिळेल.
पण आपली आपली अशी खाजगी स्पेस संपेल.
त्यांनी वाचलं तर त्या म्हणतील, प्रत्येकालाच माझी अडचण होते का.. मी सगळं करून शेवटी एकटी....
................
एकटं असणं चांगलं की वाईट....???

 I sometimes prefer to be alone...

she hates to be lonely....

I choose to be with myself...

She loves to be with someone...

I guess thats the difference, between being alone... and being lonely..

you choose one, another one chooses you...




Comments