रिप्लाय...



सेल्फिश..

कसा आहेस..
खूप आठवण आली तुझी.. म्हणून पाठवला whatsapp..

तू किंवा मी एकमेकांचे मेसेजेस वाचतोय की नाही..
हे दाखवणारे ब्ल्यू टिक्स ऑफ केलेत आपण केव्हाच ..

एकमेकांच्या जाणीवा वाचतोय की नाही हे महत्वाचं...
मेसेज वाचून फोन करू नकोस...

त्या क्षणाला मागे टाकून पुढे निघून गेलं असेल माझं मन..

तुझी नजर.. तुझं हसू.. तुझा उपजत बेस असलेला, कॉफीच्या अरोम्यासारखा आवाज, डोळ्यात

साठवून घेतलेल्या तुझ्या माझ्या प्रत्यक्ष भेटींचा recap बघतेय मी मनाच्या ७० mm स्क्क्रीनवर..

आणि तो आत्ता जास्त हवाहवासा आहे तुझ्या ख-या खु-या वर्तमानातल्या फोन कॉलपेक्षा...

म्हणून म्हणतेय फोन करू नकोस..

लिहून द्यायचं राहून दिलेलं गाणं, तुझ्याचसारख्या एका पागल करून सोडणा-या पात्राचे संवाद, आशा

रफीचं “ जमी से हमे आसमा पर बिठा के गिरा तो न दोगे, अगर हम ये पूंछे के दिल में बसा के

भुला तो न दोगे...”, शिजत ठेवलेला राजमा राईस, ,

इतक्या फाईल्सच्या विंडोज ओपन असतात त्या एका क्षणाच्या स्क्रीनवर.. 

म्हणून म्हणतेय, तू फोन करू नकोस,

कारण तू फक्त निमित्त असतोस- तिकीट असतोस माझ्या आवडत्या प्रवासाचं...

तुला मेसेज केल्यावर मग मी सगळ्या आठवणीना भेटून येते. घडून गेलेल्या आणि घडू शकल्या असत्या अशा शक्यतांना एखाद्या फिल्मचं ट्रेलर बघावं तसं बघून येते...

तेवढ्या वेळात १२ मिस्ड कॉल्स येऊन गेले असतात.

४ तुझे.. ४ संगीतकाराचे ३ दिग्दर्शकाचे आणि १.. माझ्या नव-याचा...

आणि मी पुढच्या कामाला सुरु करण्या आधी,

आठवणीच्या नव्या प्रवासाचं नवीन तिकीट काढण्या आधी,

शक्यतांच्या नव्या ट्रेलर वर क्लिक करण्या आधी..


नव-याच्या त्या एका मिस्ड कॉलला रिप्लाय करते..

कारण जेव्हा मी माझ्या ह्या तमाम प्रवासाना निघाले असते, समोर असून सुद्धा वेगळ्याच जगातून शब्दांमागे धावत असते, आठवणींच्या काजव्यांना गोळा करत असते...

तेव्हा तो शांतपणे निजवत असतो आमच्या बाळाला.. त्याचंच एखादं सुंदर गाणं गाऊन..

I owe him buddy...

म्हणून म्हणतेय..

फोन करू नकोस..
................................................

Comments