YE LAMHE...YE PAL HUM... BARSO YAAD KARENGE...




लहानपणापासून मला माधुरी आवडायची- आणि माझ्या भावाला श्री देवी... आधी नुसता वाद- मग तो बघायचा म्हणून मी श्री देवीला बघायला लागले – तिची गाणी- तिचं नाचणं तिची अदा तिचा ताकदीचा अभिनय... तेव्हा मान्य करण्याची तयारी नसायची पण अजूनही आठवतं आहे- मी लम्हे आणि चांदनी फक्त तिच्या एकेका लुक साठी एक्स्प्रेशन्स साठी इतक्यांदा बघितले... आजही बघते.. माधुरी फेवरेट असूनही श्री देवी चं मोठेपण मनात मान्य होत गेलं.. मग कळायला लागल्यावर सदमा बघितला... नि:शब्द झाले.. अजून मोठी झाले, मन तुलनेच्या पलीकडे गेलं... युट्युब आलं वाय फाय आलं आणि आता लक्षात येतंय- की सगळ्यात आधी कुठल्या फिल्म्स विकत घेतल्या yrf च्या साईट वरून- तर लम्हे आणि चांदनी...  मिस्टर इंडिया असो की मॉम.. श्रीदेवीने तिचा बाप अभिनय दाखवून दिला.. मोरनी असो की हवाहवाई तिच्या नृत्याची जादू आजपण आहेच मनावर- चालबाज मधला डबल रोल असो की जुदाई मधली लोभी स्वार्थी ग्रे श्रीदेवी, तिचं डेडिकेशन तिच्या कामात दिसायचं- इंग्लिश विन्ग्लीश ने तर comeback काय असतो ते दाखवून गेलं. दुसरीच कोणीतरी अभिनेत्री लहानपणापासून प्रचंड आवडत असतानाही इतकं फॉलो मी आजवर दुस-या कुठल्याही actressला केलं नाहीये... आज श्रीदेवी गेल्याच्या वाईट बातमीने पहाटे धसकून जाग आली- आणि लहानपणापासून मान्य न केलेल्या fanपणाचा एक तुकडा मोडून पडल्यासारखं वाटलं...

ये लम्हे ये पल हम बरसो याद करेंगे...

ये मौसम चले गये तो .... हम फरियाद करेंगे...



Comments